बटाटा भजी-
खूप प्रसिद्ध आणि चविष्ट पदार्थ आहे पण तेलकट होतो त्या मुळे जास्त लोकांना खावयाची भिती वाटते. पण आज आपण काही अशा टिप्स वापरु ज्याने भजी तेलकट होणार नाहीत व त्यांची चव ही दुप्पट होईल. बटाटा भजी बनवायला सुरुवात करुया.
साहित्य-
1)- बटाटे- 2
2)- बेसन पिठ - आर्धी वाटी
3) तांदुळाचे पीठ- 3 ते 4 चमचे
4) कॉर्न फ्लोर- 2 ते 3चमचे
5) कश्मिरी लाल तिखट- 1 चमचा
6) मीठ- चवीनुसार
8) पाणी- आर्ध ग्लास (अंदाजे वापरु शकता)
7) तेल - तळण्यासाठी
कृती-
सर्वप्रथम बटाट्या ची साल काढून घ्या, व सर्व बटाटे साल काढून झाल्यावर स्वछ पाण्याने धुवून घ्या. वेर्फस साठी वापरतो त्या खिसनी ने त्याचे पातळ काप करुन घ्या व त्यांंनतर बटाटे धुवू नये.
आता एक बाउल मधे आर्धी वाटी बेसना चे पीठ घ्या व त्यात 3 चमचे तांदूळाचे पीठ व 2चमचे कॉर्न फ्लोर टाका. आता चवीनुसार मीठ व 1चमचा लाल तिखट व पाणी घालुन व्यवस्थित मिक्स करुन घ्या. पाणी आपण अंदाज घेवुन वापरा जास्त घट्ट ही नसावा व पातळ ही नसावा असा टेक्सचर मधे पीठ भिजवून ठेवा.
आता एका कढईत तेल टाका तळण्यासाठी व ते गरम होइ पर्यंत थांबा तेल गरम झाल्यावर एक-एक बटाट्याचे काप घेऊन पिठा मधे बुडवून तेला मधे सोडा. एकदम 6ते 7 काप सोडू शकता. अगदी पूरी सारखे फुलून वरती येतात. थोडा रंग सोनेरी झाला की आपण ते टिशु पेपर वर काढून घ्या.
याच पद्धतीने सगळे भजी बनवून घ्या. अगदी मस्त थोडेसे तिखट असे भजी तैयार आहेत. सॉस किंवा चटणीसोबत खायला घ्या.
0 Comments