आळूवडी
अगदी खमंंग आणि चविष्ट पदार्थ आहे. एकदा नक्की करुन पाहा.
साहीत्य-
1- आळूची पाने - 10 (कमीत कमी )
2-लसूण- 9ते 10पाकळ्या
3- सुख खोबरे- 12ते 15काप
4- जिरे- 1 चमचा
5- कोथींबीर- 7ते 8 काढ्या
6- लिंबू चा रस - 2 चमचे
7-बेसना चे पीठ- 1 वाटी
8- हळद- 1 छोटा चमचा
9- लाल तिखट- 2 चमचे (टेबल स्पून )
10- गरम मसाला- 1 छोटा चमचा
11- तेल - तळण्यासाठी
कृती-
सर्वप्रथम आळूची पाने स्वच्छ करावी व त्यांचे देट कापुन टाकवे एका पराती मधे पाणी टाकून त्यात लिंबू पिळावा व आळूची पाने त्यात 10मिनिटासाठी भिजत ठेवावी. असे केल्याने घशात खव-खवण्या चा त्रास होत नाही.
आता एका मिक्सर चा भंड़यात लसूण, खोबरे, जिरे व कोथींबीर पाणी न घालता वाटून घ्यावी. व हे मिश्रण एका बाउल मधे काढून घ्या व त्याच मिश्रण मधे 1 वाटी बेसनाचे पीठ, 1छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा गरममसाला, 2 चमचे लाल तिखट ,चवीनुसार मीठ व अर्धा ग्लास पेक्षा थोडं कमी पाणी घालून एकजीव करा. हे मिश्रण आपल्याला घट्ट हवं.
आता आपण भिजत ठेवलेली आळूची पाने एक-एक करुन घ्यावी व थोडा त्यावरील पाणी निघावे ह्या साठी वेग-वेगळे करुन ठेवावी अगदी 5 मिनिटात ते सुखतात व पाणी आळू चा पानां वरुण निघुन जाते.
आता आळूचा पानांंनचा आकार पाहून ते एका पाठवर किंवा ताठा वर एक पान ठेवा व हे मिश्रण पूर्ण एका भागावर हाथा ने लावून घ्या. आता दुसरं पान घ्या व ते पहिल्या पानावर ठेवा व त्याचा ही वरचा भागास हे मिश्रण लावून घ्या . आपल्याला हवे तेवढी पानं आपण घेवू शकता 3ते 5 पानांंची लेयर करा व त्याचा रोल करुन घ्या रोल हा वरुण खाली असा असावा. त्याच बरोबर रोल पुर्ण झाला की दोनी कडुन रोल ची कडे व्यय्स्थीत मिटवुन घ्या.
आता एका कुकरच्या डब्ब्याला आतुन तेल लावून घ्या व आपले 5 किंवा 3 पानाचे रोल कुकर च्या तेल लावलेल्या डब्ब्यांत ठेवा वरती झाकण ठेवा व कुकर बंद करुन 3ते 4शिट्टी कडुन घ्या.
कुकर पूर्ण थंड झाल्या वर वडी कापुन घ्या.
आता कढइ मधे तेल गरम करुन त्यात थोड्या -थोड्या वड्या टाकून तळून घ्या.
वड्या तैयार आहेत.
0 Comments