चिकन दालचा
चिकन दालचा हा पुण्याची अगदी प्रसिद्ध पदार्थआहे व तो कसा बनवावा हे थोडक्यात जाणुन घेऊया.
लागणारे साहित्य-
1- चिकन- 1किलो
2- दुधी भोपळा- 150 ग्राम (एक असेल तरी चालेल)
3- उडीद डाळ -250ग्राम (2 मोठ्या वाट्या ही चालेल )
4- दालचा गरम मसाला- 2 मोठे चमचे
5- खडा मसाला- लवंग, दालचिनी, तमालपत्र, काळी मिरी,
(हे सर्व प्रत्येकी 4ते 5)
6- कांदा- 2 बारिक चिरलेला
7- टोमेटो - 2 बारिक चिरलेले
8- आल - 2 इंच
9- लसूण - 2कांदे
10- मीठ- चवीनुसार
11-लाल तिखट- कश्मिरी लाल 1चमचा रंग येण्यासाठी
12- लाल तिखट - कांदा लसूण पाउडर चविनूसार
13- चिंच किंवा कोकम- चे पाणी आर्धी वाटी
14- कोथींबीर- बारिक चिरलेली.
कृती-
सर्वप्रथम चिकनला हळद व मीठ लावून घ्या व कूकरमधे 1 पळी तेल टाकून चिकन परतून घ्या. काही वेळ ठेवल्यानंतर थोड़ पाणी टाका व 2ते 3 शिट्ट्या करुन घ्या. कूकर थंड होई पर्यंत एका बाजूला उडीद डाळ, पाणी, चिमुठभर हळद व चवीनुसार मीठ टाकून शिजवून घ्या. त्यांनतर दुधी भोपळा चिरुन त्याचा पांढरा भाग काढून तो ही शिजवून घ्यावा.
आता एका मोठ्या टोपात 2 पळी तेल टाका व गरम होतच त्यात, तमालपत्र, काळी मिरी, दालचिनी व लवंग टाका व त्याच बरोबर बारिक चिरलेला कांदा टाका व लालसर होई पर्यंत भाजून घ्या. कांदा व्यवस्थीत भाजून झाल्यावर त्या मध्ये आल लसूण पेस्ट टाका व कश्मीरी लालतिखट 1 चमचा रंग येण्यासाठी तसेच चवीनुसार मीठ व कांदा लसूण मसाला सुद्दा तिखट चवीनुसार टाका (साधारण 2 चमचे पुरेसा आहे).
2 चमचे दालचा मसाला व 1चमचा गरम मसाला टाकून व्यवस्थित शिजवून घ्या. आता त्या मधे शिजलेल चिकन व शिजलेला दुधी भोपळा टाका व एकजीव होईपर्यंत परतून घ्यावे.
आता शिजलेली उडदाची डाळ वरुन टाका व त्यात चिंच भिजवून ठेवलेले पाणी टाका उखळी येऊ दया आता. बारिक चिरलेली कोथिंबीर टाका व हवे तेव्हां ताठभरुन व पोटभरुन खा.
0 Comments