eggless custard pudding recipe

बिना अंड्यांची कस्ट्र्ड पुडिंग रेसिपी

eggless custard pudding recipe in Marathi




साहित्य-

1-दुध-  1 लिटर 

2- कसटर्ड़ पाउडर-  200ग्राम

3- वेलचीपुड- 1 चमचा 

4- केसर - 4 ते  5 पाकळ्या 

5-  काजू-  5 ते 6

6-बदाम-5ते 6

7- मणुके - 5ते 6

8- पिस्ता - 5 ते 6

9-  तेल -2चमचे (कोणतेही रिफाइंड़ तेल चालेल)

10- साखर-  आर्धी वाटी 

कृती

सर्वप्रथम एका पसरट कडई मधे 1लिटर दुध टाका व गैस सुरू करुन त्यावर ठेवुन दया. उखळी आल्यानंतर पळी ने किंवा चमचाच्या  मदतिने दुध हलवत रहा. 15 ते 20मिनीट मंद गैसवर दुध थोडेसे आटु दया. 

दुध आटे पर्यंत काजू,बदाम  व पिस्ता  याचे उभे पातळ काप करुन घ्या. 

आता कसटर्ड़ पाउडर एका बाऊल मध्ये काढूण घ्या व त्यात 2 ते 3 चमचे तेल टाका व 1 कप दूध टाकून एकजीव करुन घ्या.  व त्यात गाठी होउ नये एवढं ते एकजीव करून घ्यावे.   गाठी राहिल्या तर दुधात टाकल्यास त्या एकाच ठिकाणी जमा होतील. 

 (इथे केलेला तेलाचा वापर हे अंड्या चे काम करतो जो की एक चमक निर्माण करण्यासाठी असतो. तेलाचा वापर करण्या मुळे अंड्यांच्या वापर करण्याची गरज  लागणार नाही.)  

आता दूध थोडेसे घट्ट झाले आहे हे पाहता आपण त्यात केसर व वेलची पूड घालून दुध  हलवावे. दुधाला थोडा केसर च रंग आला अस्ल्यास त्यात कसटर्ड़ पाउडरचा एकजीव केलेला पातळ घोळ टाकावा व सतत चमचा चा सह्हयाने हालवत रहा. आता कापलेला काजू, बदाम, पिस्ता व मणुके त्यात टाका व आर्धी वाटी साखर टाका (साखर आपण जास्त व कमी घेऊ शकता पण पुडिंग हे जास्त गोड करु नये) .  अजून 10 ते 15 मिनिट गैस सुरू राहू दया.  

10  ते 15 मिनीटे झाल्यावर या पुडिंग चा घट्टपणा चेक करा व   गैस बंद करा, कारण अगदी जास्त ड्राय करायची ही गरज नसते हा थंड झाल्यावर ही थोडा अजून घट्ट होतो.

 थंड झाल्यावर एक तासाभरासाठी  फ्रिज मध्ये ठेवा. व एक तासानंतर सर्व करा. 

आपली कसटर्ड़ पुडिंग रेसिपी तैयार आहे. थोडा वेळ जातो पण अतिशय छान अशी चवदार रेसिपी आपणास खावयास घरच्या घरी करता येते. 













 

Post a Comment

0 Comments